Pune : लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे झाले पूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात लोकसहभाग आणि श्रमदानातून ( Pune ) वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध विभागामार्फत आतापर्यंत 1 हजार 200 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

पावसाची अनियमितता आणि त्यातील खंड यामुळे काही तालुक्यात पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्या अनुषांगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याची मोहीम कृषी व अन्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Dehugaon : विद्यार्थ्यांना शिक्षा करताना ती शिक्षणाशी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी पूरक ठरावी – ॲड. सीमा तरस

या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी सेवा केंद्र, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 10 हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट आहे.

वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, जनावरांना, भाजीपाला आणि कडधान्य यासारख्या पिकांसाठी होतो. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यामध्ये रेती, वाळू भरून आणि त्यांची तोंडे शिवून बंधाऱ्यासाठी वापरता येतात.

बंधाऱ्याची उंची दीड मीटरपेक्षा अधिक नसावी. नागरिक आणि विविध संस्थांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात ( Pune ) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.