Pune : 1240 रुग्ण कोरोनामुक्त, 924 नवे रुग्ण, 22 जणांचा मृत्यू

924 नवे रुग्ण आढळले. 22 जणांचा मृत्यू झाला. ; 1240 patients corona free, 924 new patients, 22 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, मंगळवारीही तब्बल 1240 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 924 नवे रुग्ण आढळले. 22 जणांचा मृत्यू झाला. 735 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 443 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 67 हजार 651 रुग्ण झाले आहेत. 51 हजार 353 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 593 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 705 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

वडगांव बुद्रुकमधील 42 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 75 वर्षीय पुरुषाचा, एअरपोर्ट रोडवरील 62 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 71 आणि 65 वर्षीय पुरुषाचा, भवानी पेठेतील 71 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 45 वर्षीय पुरुषाचा, खराडीतील 55 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 55 वर्षीय पुरुषाचा, दांडेकर पुलावरील 48 वर्षीय महिलेचा, फुरसुंगीतील 55 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

धनकवडीतील 64 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 60 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 55 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 50 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 69 वर्षीय महिलेचा रायसिंग मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

हडपसरमधील 54 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 56 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 20 वर्षीय पुरुषाचा विश्वराज हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 65 वर्षीय पुरुषाचा संचेती हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 56 वर्षीय पुरुषाचा, कर्वेनगरमधील 67 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.