Pune : ससून रुग्णालयात 130 रुग्णांची कोरोनावर मात; आज आणखी 7 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनामुळे शुक्रवारी ( दि. 22) आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 128 जण दगावले आहेत. तर, 130 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोंढाव्यातील 33 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 70 आणि 62 वर्षीय पुरुषाचा, गंजपेठेतील 72 वर्षीय महिलेचा, घोरपडीतील 45 वर्षीय महिलेचा, नानापेठेतील 48 वर्षीय पुरुषाचा, केशवनगरमधील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, श्वसनाचा विकार, हृदयाचा व किडनीचा आजार होता.

पुणे जिल्हयात 5 हजार 14 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. तर 2 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 190 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आज नव्याने तब्बल 297 कोरोनाचे रुग्ण आढळले.

कोरोनाचा चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा प्रसनातर्फे करण्यात आले आहे. ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागांतही कोरोना वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनातर्फे तब्बल 7 उच्च दर्जाचे अधिकारी देण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.