Pune : ‘वन महोत्सव वृक्षारोपण’ उपक्रमात 130 विद्यार्थ्यांचा सहभाग 

130 students participate in Forest Festival tree planting activity

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या वन महोत्सव वृक्षारोपण उपक्रमांतर्गत 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळच्या परिसरात वृक्षारोपण केले आणि त्याचे व्हिडीओ ऑनलाईन वेबिनार मध्ये सादर केले. अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्य डॉ. किरण भिसे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना आणि स्टुडंट डेव्हलपमेंट एक्टिव्हीटी  सेल ने आयोजित केलेला हा उपक्रम मंगळवारी (दि.7) पार पडला. डॉ. दिलनवाज पठाण, प्राध्यापक रजत सय्यद, डॉ.राणी पोटवळे, डॉ .एजाझ शेख, स्वप्नील दौंडे, विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.