Pune : ‘कोरोना’तून 1315 जण बरे, 1699 नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

1315 people were cured, 1699 new patients and 30 died from corona : आतापर्यंत पुणे शहरात कोरोनाचे 53 हजार 437 रुग्ण झाले आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आजारातून आज, गुरुवारी 1315 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या 6 हजार 241 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1699 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये कोरोनाचे 927 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 471 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनाचे 53 हजार 437 रुग्ण झाले आहेत.

यामध्ये 33 हजार 938 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 284 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 18 हजार 215 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

वडगाव बुद्रुकमधील 63 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 60 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 66 वर्षीय पुरुषाचा, पाषाणमधील 77 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 70 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कोरेगाव पार्कमधील 59 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, एरंडवनेतील 50 वर्षीय आणि 83 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 38 वर्षीय पुरुषाचा, खराडीतील 41 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोथरूडमधील 57 वर्षीय पुरुषाचा, गणेश पेठेतील 70 वर्षीय महिलेचा, कसबा पेठेतील 53 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 59 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 73 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 50 वर्षीय पुरुषाचा, ताडीवाला रोडवरील 68 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 69 वर्षीय पुरुषाचा, धानोरीतील 42 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

आळंदी रोडवरील 53 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 52 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, शिवाजीनगर मधील 67 वर्षीय महिलेचा, वडगांव बुद्रुकमधील 71 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 72 वर्षीय महिलेचा, शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 71 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, नारायण पेठेतील 73 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सोमवार पेठेतील 57 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, घोरपडी गावातील 60 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.