Pune : ATM कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने 14 लाख लुबाडले

14 lakh was stolen under the pretext of updating ATM card सायबर चोरट्यांनी आणखी एकाला गंडवलं

एमपीसी न्यूज – सध्या संपूर्ण शहरात सायबर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकांना फोन करून वेगवेगळी आमिषे दाखवून, प्रलोभन दाखवून, सिमकार्ड अपडेट करण्याचा बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली. कोथरूड परिसरातुनही असाच एक प्रकार उघडकीस आला असून एका व्यापाऱ्यास सायबर चोरट्यांनी 14 लाखाचा गंडा घातला आहे. एका 38 वर्षीय व्यापाराने याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे सिम कार्ड अपडेट करावयाचे आहे असे सांगून त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेतली. त्यानंतर या चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी 14 लाख 50 हजार रुपये काढून घेतले. तुमच्या खात्यात ही रक्कम पुन्हा जमा केली जाईल असे सांगून हे चोरटे आठ दिवसापासून बँक खात्यातून रक्कम काढत होते.

दरम्यान आठ दिवसानंतर ही पैसे जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली अधिक तपास सायबर पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.