Pune : कोरोनाचे 152 नवे रुग्ण, 113 जणांना डिस्चार्ज; 14 मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण आणि बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असून बुधवरी या रोगामुळे तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला. तर, 113 ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाबाधित 165 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3 हजार 899 झाली आहे. डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 3500 आणि ससूनमध्ये 399  रुग्ण उपचार घेत आहेत.

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 656 आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 221 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 23 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 1 हजार 507 कोरोनाचा चाचण्या करण्यात आल्या.

आज ससून रुग्णालयात कल्याणीनगर मधील 69 वर्षीय पुरुषाचा, पुणे कॅम्पमधील 60 वर्षीय पुरुषाचा, खराडीतील 37 वर्षीय पुरुषाचा, मंगळवार पेठेतील 74 वर्षीय पुरुषाचा, पुणे कॅम्पमधील 61 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 50 वर्षीय महिला आणि 57 वर्षीय पुरुषाचा, तडीवाला रोड भागातील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्चरक्तदाब, किडनी विकार, मधूमेह, लठ्ठपणा, झटके येण्याचा आजार, हृदयाचा आजार, असे अनेक आजार होते.

तर, महात्मा फुले वसाहतमधील 50 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 71 वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये, जनता वसाहतमधील 74 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, गुलटेकडी येथील 44 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 76 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिरूर तालुक्यातील 69 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

मृतांमध्ये एकूण 11 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात 4 हजार 525 बाधीत रुग्ण आहेत. कोरोना बाधित 2 हजार 184 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 178 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयात आज कोरोनाचे 245 रुग्ण वाढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.