Pune : पालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमधील तीन निवासी डॉक्टर्ससह 14 कर्मचारी क्वारंटाईनमध्ये!

तपासणीवेळी कोरोनाबाधित रुग्णाच्या आले संपर्कात

एमपीसी न्यूज – एका गर्भवती महिलेवर तपासणी करताना सोनवणे हॉस्पिटलमधील तीन निवासी डॉक्टर्ससह चौदा कर्मचारी संपर्कात आले होते. तपासाअंती महिला कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने दक्षता म्हणून महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या तीन निवासी डॉक्टर्ससह चौदा कर्मचारी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत मिळलेली माहिती अशी, पुणे महानगरपालिकेच्या कै. चांदुमामा सोनावणे प्रसूतिगृह भवानी पेठ येथे दिनांक १२ एप्रिल २०२० रोजी ५ महिन्याची एक गर्भवती महिला उपचारार्थ दाखल झाली होती. तिला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत असल्यामुळे तेथील डॉक्टर्स व सहकारी यांनी तपासणी केली. लक्षणे पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचाराकरिता या महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यानच्या कालावधीमध्ये कात्रज येथील भारती हॉस्पिटलमध्ये व्यवस्था उपलब्ध झाल्याने या महिलेला पुढील उपचारार्थ भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून तिची तब्येत उत्तम आहे. उपचार करणारे सोनवणे हॉस्पिटलमधील 3 निवासी डॉक्टर्स 9 नर्सेस, 1 आया, 2 नर्सिंग ऑर्डरली व 2 अन्य कर्मचारी असे एकूण 17, कर्मचाऱ्यांना दक्षता म्हणून “विलगिकरण” करण्यात आले आहे.

या 17 कर्मचाऱ्यांच्या घेण्यात आलेल्या स्वबचे नमुने पुढील तपासणीकरिता राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या सर्व 17 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भावाबाबत कोणतेही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील कोणीही वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय स्टाफ, कोरोना विषाणू प्रादुर्भाव बाधित,पॉझिटिव्ह नाहीत. याबाबत पूर्णपणे दक्षता घेण्यात आलेली आहे.

सद्ययस्थितीत पुणे मनपाच्या कै. चँदुमामा सोनावणे रुग्णालयातील महिलांची प्रसूती व नवजात बालकांचे अतिदक्षता विभागात प्रवेश देणे बंद केलेले आहे. या रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सेस व अन्य कर्मचारी यांचे साहाय्याने या रुग्णालयातील फक्त बाह्य रुग्ण विभाग (OPD) चालू रहाणार आहे.

या रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती स्त्री व नवजात बालक यांना तपासणी व उपचाराकरिता मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात अथवा येरवडा येथील स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयात लाभ घेता येइल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.