Pune News : पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश 

एमपीसी न्यूज :  पुण्यातील वानवडी भागात राहणार्‍या (Pune News) 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे.

 

वानवडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक भूषण पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी भागातील फुट पाथवर एक 65 वर्षीय आजी भीक मागून कुटुंबीयांचा सांभाळ करीत आहे.(Pune News) तिच्या 40 वर्षीय मुलाला, 14 वर्षाची मुलगी आहे.तर सुनेच निधन काही वर्षापुर्वी झाल आहे.आजीचा मुलगा सतत आजारी असल्याने तो काहीच काम करीत नाही.कुटुंबाची सर्व परिस्थिती पाहून पुढे चालून मुलीची देखील तिच अवस्था होऊ नये. त्यामुळे आजीने 14 वर्षीय नातीचा विवाह 2 मुलाचा वडील असलेल्या अंदाजे 35 वर्षीय व्यक्ती सोबत करण्याचे ठरविले.

 

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

 

त्या विवाह बाबत आम्हाला माहिती मिळाली.त्या मुलीचा विवाह आज शुक्रवारी आळंदी येथे होणार होता.त्या पार्श्वभूमीवर कालच आमची टीम आजीच्या घरी जाऊन चौकशी केल्यावर सर्व घटना समोर आल्यावर संबधित मुलीला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन केले जात असून तिला एका संस्थेमध्ये दाखल केले आहे. (Pune News) तसेच त्या मुलीच्या आजीकडे अधिक चौकशी केली जात असून या घटनेमध्ये 14 वर्षीय मुलीसोबत लग्न करणार्‍या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.