Pune : जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितची रुग्ण संख्या 141; नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ‘कोरोना’चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आता ही संख्या 141 झाली आहे. रविवारी 24 तर, सोमवारी 36 कोरोनाचे रुग्ण आढळले.

मुंबईनंतर पुण्यात रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. दररोज 20 याप्रमाणे रुग्ण वाढत आहेत. लोकांना वारंवार घरीच बसण्याचे आवाहन अधिकांऱ्याकडून करण्यात येत आहे. मात्र, लोक काही घरी बसायला तयार नाही, असेच चित्र काही ठिकाणी आढळत आहे.

वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आता डॉ. नायडू रुग्णालय कमी पडत आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या रुग्णांची आता बोपोडी येथील पुणे महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.