Pune : विभागातून 1,42,781 परप्रांतीय मजूर 107 विशेष रेल्वेने रवाना : डॉ. दीपक म्हैसेकर

स्थलांतरित मजुरांची राहणे आणि जेवणाची प्रशासन करत आहे सोय

एमपीसीन्यूज : लॉकडाऊनमुळे पुणे शहर परिसरात अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर व आसाम राज्यामधील 1 लाख 42 हजार 781 नागरिक मजुरांना घेऊन पुणे विभागातून 22 मे 2020 अखेर 107 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 51, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 21, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी4 , छत्तीसगडसाठी 4 , जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरासाठी 1, आसामसाठी 1 अशा एकूण 107 रेल्वेगाडया 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.

या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

# स्थलांतरित मजुरांसाठी निवारा व भोजनाची सोय

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 41 कॅम्प, कामगार विभागामार्फत 14 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 5 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 60 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 2 हजार 379 स्थलांतरित मजूर असून 19 हजार 425 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

# अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा

लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 15 हजार 673 क्विंटल अन्नधान्याची तर 7 हजार 741 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 2 हजार 249 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 18 हजार 287 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 21 मे 2020 रोजी 97.01 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.36 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.