Pune : 1449 नागरिक कोरोनामुक्त, 1584 नवे रुग्ण, 28 जणांचा मृत्यू

पुणे शहरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. : 1449 civilians coronafree, 1584 new patients, 28 died

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारीही तब्बल 1449 नागरिक या आजारातून मुक्त झाले आहेत. 6 हजार 213 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1584 नवे रुग्ण आढळले. 28 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 735 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 445 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 69 हजार 235 रुग्ण झाले आहेत. 52 हजार 802 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 621 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 812 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 69 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 78 वर्षीय पुरुषाचा, कोंढवा बुद्रुकमधील 45 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 60 वर्षीय पुरुषाचा, खराडीतील 70 वर्षीय महिलेचा, केशवनगरमधील 63 वर्षीय पुरुषाचा, शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 63 वर्षीय पुरुषाचा, आंबेगाव बुद्रुकमधील 60 वर्षीय महिलेचा, पर्वतीमधील 71 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 67 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

रामवाडीतील 69 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 57 वर्षीय पुरुषाचा, शिवाजीनगरमधील 90 वर्षीय पुरुषाचा, रामनगरमधील 53 वर्षीय पुरुषाचा, विमाननगरमधील 45 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 66 वर्षीय पुरुषाचा, कर्वेनगरमधील 54 वर्षीय पुरुषाचा आणि 60 वर्षीय महिलेचा, वारजेतील 79 वर्षीय महिलेचा, फातिमानगरमधील 59 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

हांडेवाडीतील 75 वर्षीय पुरुषाचा, नांदेड सीटीतील 68 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 71 वर्षीय पुरुषाचा, गुलटेकडीतील 37 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिग होममध्ये, एरंडवनेतील 74 वर्षीय पुरुषाचा देवयानी हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 75 वर्षीय पुरुषाचा सना हॉस्पिटलमध्ये, औंध रोडवरील 72 वर्षीय पुरुषाचा डी. एच. औंध हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.