Pune : शहरात कोरोनाचे 1479 रुग्ण, 817 जणांना डिस्चार्ज, 29 मृत्यू

1479 patients of corona in the city, 817 discharged, 29 deaths : सध्या शहरात विविध रुग्णालयात 663 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 102 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या शुक्रवारी 5 हजार 747 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1479 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 817 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 29 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात विविध रुग्णालयात 663 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 102 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आजपर्यंत कोरोनाचे पुणे शहरात 45 हजार 544 रुग्ण झाले आहेत. 26 हजार 725 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 133 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 686 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

राजीव गांधी नगरमधील 47 वर्षीय महिलेचा दळवी हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 49 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 87 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 63 वर्षीय पुरुषाचा, बाणेरमधील 77 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, साईनगरमधील 42 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 87 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

_MPC_DIR_MPU_II

घोरपडी पेठेतील 46 वर्षीय पुरुषाचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 68 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, येरवड्यातील 48 वर्षीय पुरुषाचा AIMS हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 56 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, बाणेरमधील 53 वर्षीय पुरुषाचा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 69 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये मृत्यू झाला.

सिंहगड रोडवरील 65 वर्षीय महिलेचा, फातिमानगरमधील 77 वर्षीय महिलेचा, केशवनगरमधील 50 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 75 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, शनिवार पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा संजीवन हॉस्पिटलमध्ये, केशवनगरमधील 74 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 45 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 76 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

पर्वतीमधील 39 वर्षीय पुरुषाचा, पौड रोडवरील 59 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 66 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 63 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 92 वर्षीय पुरुषाचा आणि 65 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, पर्वती दर्शनमधील 79 वर्षीय पुरुषाचा, पांडवनगरमधील 69 वर्षीय पुरुषाचा रत्ना हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1