Pune Corona Update : तब्बल 1499 रुग्ण कोरोनामुक्त, 761 नवे रुग्ण, 31 जणांचा मृत्यू

शहरात सध्या 738 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 444 जण व्हेंटिलेटरवर आहेत. ; 1499 civilian coronary free, 761 new patients, 31 deaths

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी तब्बल 1499 रुग्ण कोरोनाच्या आजरातून बरे झाले. कोरोनाच्या 5 हजार 135 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 761 नवे रुग्ण आढळले. 31 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 738 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 444 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 66 हजार 727 रुग्ण झाले आहेत. 50 हजार 113 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 1 हजार 571 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 43 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 60 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 68 वर्षीय महिलेचा, शिवाजीनगरमधील 56 वर्षीय महिलेचा, चंदननगरमधील 52 वर्षीय पुरुषाचा, वैदवाडीतील 68 वर्षीय महिलेचा, 38 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

हडपसरमधील 72 वर्षीय पुरुषाचा, फुरसुंगीतील 75 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 70 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 80 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोडवरील 61 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 43 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, घोरपडी गावातील 79 वर्षीय महिलेच रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

वाघोलीतील 74 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, विश्रांतवाडीतील 73 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 58 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 65 वर्षीय पुरुषाचा, गुरुवार पेठेतील 29 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 63 वर्षीय पुरुषाचा, कसबा पेठेतील 85 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

वारजेतील 87 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, केशवनगरमधील 63 वर्षीय पुरुषाचा, बी. टी. कवडे रोडवरील 69 वर्षीय पुरुषाचा, वडगाव बुद्रुकमधील 55 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

वडगावशेरीमधील 70 वर्षीय पुरुषाचा रत्ना हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 40 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये, हनुमंतनगर मधील 75 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 44 वर्षीय महिलेचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये, रविवार पेठेतील 67 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, हिंगणे खुर्दमधील 57 वर्षीय पुरुषाचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.