Pune: जिल्ह्यात गेल्या 12 तासांत नवे 15 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 580 वर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासांत नवीन 15 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 580 वर गेली आहे. काल रात्री जिल्ह्यात एकूण 565 कोरोनाबाधित रुग्ण होते, मात्र मृतांची संख्या 48 होती. राज्य शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. 

जिल्ह्यात कालअखेर 5,703 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 565 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 4942 व्यक्ती कोरोना निगेटीव्ह ठरल्या आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 4,980 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजून 675 रुग्णांवर विलगीकरण कक्षात आहेत, असे पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भागवत पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे 130 रुग्ण

पुणे शहरात एकूण 508 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 130 रुग्ण हे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आहेत. महापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांची क्षेत्रीय कार्यालय हद्दीनुसार विभागणी करून त्याचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. एकूण 508 पैकी 492 रुग्णांचा नकाशात उल्लेख करण्यात आला आहे.  कोरोनाबाधितांची क्षेत्रीय कार्यालय निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.

भवानी पेठ – 130, कसबा- विश्रामबाग वाडा – 63, ढोले पाटील रोड – 61, वानवडी- रामटेकडी – 54, येरवडा-कळस-धानोरी – 48, शिवाजीनगर-घोले रोड – 33, धनकवडी-सहकारनगर – 30, हजपसर-मुंढवा – 21, बिबवेवाडी – 20, वारजे-कर्वेनगर 9, कोंढवा-येवलेवाडी – 9, सिंहगड रोड – 8, नगर रोज- वडगाव शेरी – 6, औंध-बाणेर 3, कोथरूड- बावधन – 1, महापालिका हद्दीबाहेरील – 25.

कोरोनाबाधित मृतांची विभागनिहाय संख्या

कोरोनाबाधित मृतांची सर्वाधिक संख्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतच दिसून येत आहे. त्या भागात एकूण 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कसबा- विश्रामबाग वाडा – 5, वानवडी-रामटेकडी – 5, शिवाजीनगर-घोलेरोड – 4, हडपसर-मुंढवा – 3, येरवडा-कळस-धानोरी – 3, ढोले पाटील रोड – 3, धनकवडी- शंकरनगर – 2, बिबवेवाडी – 2, औंध-बाणेर – 1, वारजे-कर्वेनगर – 1, कोंढवा-येवलेवाडी – 1, या व्यतिरिक्त दोन जण महापालिका हद्दीबाहेरील आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.