Pune Corona News : 10 दिवसांत 15 हजार 849 रुग्ण कोरोनामुक्त

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ; 15 thousand 849 patients corona free in 10 days

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऑगस्ट महिन्यातील 10 दिवसांत तब्बल 15 हजार 849 रुग्ण कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत.

पुणे शहरात सध्या कोरोनाचे 738 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 444 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे शहरात एकूण 66 हजार 727 रुग्ण झाले आहेत. 50 हजार 113 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत या कोरोनामुळे 1 हजार 571 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 43 ॲ क्टिव्ह रुग्ण आहेत. या महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत शहरात कोरोनाचे 10 हजार रुग्ण वाढले.

जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ऑगस्टमध्ये नियंत्रित असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पुणे शहरातील सर्वच व्यवहार दररोज सुरू करण्यास पुणे महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चार महिन्यांपेक्षा जास्त दिवस बंद राहिलेले मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सही सुरू झाले आहेत.

आगामी गणेशोत्सवात खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.