Pune: पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात नव्या 150 डॉक्टरांची फौज रुजू

Pune: 150 new doctors has been recruited in the health department of Pune Municipal Corporation पुण्यात दर दिवशी 700 ते 800 कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागावर ताण आला आहे. डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्याअभावी पालिकेचे 30 ते 35 रुग्णालये बंद करण्याची वेळ आली होती. परंतु, आता आरोग्य विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून 150 डॉक्टर आणि 170 परिचारिकांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतून त्यांना रुजू होण्याचे पत्रही देण्यात आले आहे.

पुण्यात दर दिवशी 700 ते 800 कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागात भरती करण्याची जाहिरात काढली होती.

त्यामध्ये डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिका अशा विविध पदांचा समावेश होता. त्यानुसार मागील आठवड्यात इच्छुक उमेदवारांची मुलाखत पार पडली असून सहा महिन्याच्या करारावर त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नव्याने भरती झालेल्या या सर्वांना शहरातील कोविड-19 केअर सेंटरसह नायडू रुग्णालय, दळवी रुग्णालय यासह ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी या डॉक्टरांना पाठवले जाणार आहे. डॉक्टर कामावर रुजू झाल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य भागावरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.