Pune : मुसळधार पावसामुळे पुणे विभागात 16 जणांचा मृत्यू; 58 पैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 16 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे. यामध्ये पुण्यातील 4, सातारा 7, सांगली 2, सोलापूर 1, कोल्हापूर 2 अशी मृत्यू झालेल्याची आकडेवारी आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटला होता. आता पुणे जिल्ह्यातील पूर रेषा सर्व्हे सुरु असून यात काही ठिकाणी अतिक्रमण असेल तर त्यावर कारवाई करुन हटविण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

पुणे विभागात 137 टक्के पाऊस झाला असून राज्यातील 58 तालुक्यापैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागात पुढील तीन दिवस अतिवृष्टी इशारा आहे. तर, भीमा खोरा परिस्थिती सुधारली आहे. काल पंढरपूरला 7 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत.

  • पुणे परिसरात सुमारे 13,336 नागरिकांना स्थलांतरित केलं आहे. अलमट्टी धरणात आता विसर्ग वाढवून चार लाख विसर्ग केला आहे. माञ, अजून सुधारणा झालेली नाही, त्यामुळं तिथं अजून विसर्ग वाढवण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. तर, आपण कोयना विसर्ग कमी करतोय. मात्र, महाबळेश्वर येथे पुन्हा पाऊस वाढला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कोल्हापूर येथील सुमारे 390 गावांच्या पाणीपुवठा बंद झाला आहे. तर, सातारामध्ये 91 गावांचा पाणी पुरवठा बंद असून त्या पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. तसेच याठिकाणी वैद्यकीय पथक काम करत आहेत. अशावेळी नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.