Pune : प्रशासनाचे पास घेऊन पुणे जिल्ह्यात 16 हजार नागरिकांचे आगमन

Pune: 16,000 citizens arrive in Pune district with administration pass

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या विविध भागातून पुणे जिल्ह्यात 16 हजार 404 नागरिकांचे आगमन झाले आहे. तर इतर राज्यातून 5 हजार 489 नागरिकांचे आगमन झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पास दिले जातात. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांची तपासणी आणि इतर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आजवर पुणे जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून 16 हजार 404 नागरिक तर इतर राज्यातून 5 हजार 489 नागरिक आले आहेत.

नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून तसेच इतर सर्व खबरदारी घेऊन त्यांना पाठविण्यात येत आहे. रेल्वे, बस यांची प्रशासनाकडून सोय केली जात आहे. देशभरातून पुणे जिल्ह्यात विद्यार्थी (2 हजार 456), यात्रेकरू/पर्यटक (384), कामगार (1 हजार 849), इतर व्यक्ती (17 हजार 204) असे एकूण 21 हजार 893 नागरिक परत आले आहेत. यापैकी राज्यातील 16 हजार 404 तर राज्याबाहेरील 5 हजार 489 नागरिक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.