Pune : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात 182 युनिट रक्त संकलन

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने इंदिरानगर येथील कै. चिंतामणराव देशमुख विद्यालय मनपा शाळा क्रमांक 99 येथे हे शिबिर घेण्यात आले. रविवारी (दि. 3) झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय रक्तपेढी यांनी सुमारे 182 युनिट रक्त संकलन केले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन संत निरंकारी मंडळाचे पुणे विभागप्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका रुपाली धाडवे, नगरसेवक पिंटूभाऊ धाडवे, महेश वाबळे, योगगुरू प्रशांत शिळीमकर आदी उपस्थित होते.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. 2) इंदिरानगर परिसरात रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी पदयात्रा काढण्यात आली. रक्तदानाचे महत्व नागरिकांना पटवून देत त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. अनंत दळवी यांनी रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.