Pune : काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणी 19 जणांना अटक

एमपीसी न्यूज – भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे काँगेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये अक्षरशः राडा घातला. प्रचंड प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 19 जणांना अटक केली. रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

नितीन सदाशिव दामगुडे (वय 30), विक्रम शिवाजी जामदार (वय 32), गणेश नामदेव जागडे (वय 32), सुमंत सुभाष शेटे (वय 36), शिवराज चंद्रकांत शेंडकर (वय 35), महेंद्र अशोक साळुंखे (वय 30), अनिल जाणू सावंत (वय 36), जितेंद्र राजेंद्र कंक (वय 34), गणेश बाळू मोहिते (वय 34), चंद्रकांत अनंत मळेकर (वय 51), बजरंग रामचंद्र शिंदे (वय 45), सिद्धार्थ संजय कंक (वय 24), अभिषेक जगन्नाथ येलगुडे (वय 37), अरुण गुलाब मिलार (वय 37), राहुल पोपट जाधव (वय 38), राहुल दिलीप बोरगे (वय 33), ज्ञानेश्वर तुकाराम भोरे (वय 40), महेश निवृत्ती टापरे (वय 31) अशी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. याबाबत पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी संध्याकाळी काँग्रेस भवनमध्ये राडा घालून प्रचंड प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले. काँगेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर थोपटे समर्थकांनी गंभीर आरोप केले. संग्राम थोपटे हे तीन वेळा निवडून आले. त्यामुळे भोर-वेल्हा-मुळशीच्या आमच्या मावळ्याला मंत्रिपद देणे गरजेचे होते. अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.