Pune : शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – शासकीय धान्य गोदामात तब्बल 19 हजार 975 टन धान्यसाठा उपलब्ध आहे. फळ, भाजीपाला, दूध सुध्दा उपलब्ध आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

मार्केटमध्ये विभागात एकूण 22913 क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक 9486 क्विंटल, फळांची 16807 क्विंटल तसेच कांदा बटाट्याची 42971 आवक झाली आहे

विभागात दि.31/03/2020 रोजी 92.46 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.24 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे. अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबंधित जिल्हयातील खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

  • पुणे जिल्हा :- 1) भानूदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी 020-26061013
    2) अस्मीता मोरे, अन्नधान्यवितरण अधिकारी 020-26123743
    सातारा जिल्हा:- 1) स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 02162-234840
    सांगली जिल्हा:- 1) वसुधंरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 0233-2600512
    कोल्हापूर जिल्हा :-1) दत्तात्रय कवीतके, जिल्हा पुरवठा अधिकारी 0231-265579
    सोलापूर जिल्हा :- 1) उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी 0217-2731003/8

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.