Pune : पुणे विभागातील चार जिल्ह्यात कोरोनाचे 191 रुग्ण -डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे जिल्ह्यात 157 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील चार जिल्ह्यात 191 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पुणे 157, सातारा 5, सांगली 26 आणि कोल्हापूर 3 याप्रमाणे रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. आतापर्यंत 27 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत 158 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 3 हजार 60 होते. त्यापैकी 2 हजार 933 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 127 चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 2 हजार 742 नमुने निगेटीव्ह आहेत व 191 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आजपर्यंत 18 लाख 33 हजार 177 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 83 लाख 79 हजार 144 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 687 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना सांसर्गिक रुग्ण संख्या एकुण 157 झाली आहे. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये दाखल झालेली रुग्णसंख्या रुग्णालयामध्ये 136 असून पिंपरी ‍चिंचवड महापालिका क्षेत्रामधील रुग्णालयामध्ये एकुण 21 रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत 27 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.

तसेच 5 रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरीत 125 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यामधून तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 2 हजार 255 होते. त्यापैकी 2 हजार 158 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 97 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 2 हजार 1 नमुने निगेटीव्ह आहेत व 157 नमुने पॉझिटीव्ह आहेत.

विभागामध्ये शासकीय व स्थानीक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडे सदयस्थीतीत एकुण N95 मास्क 65 हजार 815, ट्रीपल लेअर मास्क 2 लाख 54 हजार 678 एवढे उपलब्ध आहेत. तसेच 4 हजार 270 पीपीई कीट, 9 हजार 65 हॅण्ड सॅनिटायझर (500मिली), 4 हजार 92 व्हीटीएम कीट व शासकीय रुग्णालयात 141 व्हेंन्टीलेटर्स उपलब्ध आहेत व खाजगी रुग्णालयात 1 हजार 328 व्हेंन्टीलेटर उपलब्ध आहेत.

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा आहे. पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 33 हजार 211.453 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागात अंत्योदय (एएवाय) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (पीएचएच) योजना अंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिका /कुटुंबापैकी 7 एप्रिलपर्यंत 18 लाख 31 हजार 499 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदळचे 4 लाख 34 हजार 775.41 क्विंटल वितरण करण्यात आले आहे.

पुणे विभागातील मार्केटमध्ये 46 हजार 923 क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक झाली असून भाजीपाल्याची आवक 16 हजार 840 क्विंटल, फळांची 3 हजार 325 क्विंटल तसेच कांदा / बटाट्याची 8 हजार 244 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात 6 एप्रिल रोजी 103.35 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.38 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.

विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 117 व साखर कारखान्यामार्फत 575 असे एकुण 692 रीलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण 65 हजार 376 स्थलांतरीत मजूर असून एकुण 1 लाख 19 हजार 656 मजूरांना भोजन देण्यात येत आहे, असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.