Pune : शहरात दिवसभरात 194 डिस्चार्ज, 108 पॉझिटिव्ह; कोरोनाचे 8 बळी

194 discharges throughout the day in the city, 108 positive; 8 victims of Corona

एमपीसीन्यूज : पुणे शहरात दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या एकूण 194  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 108  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर कोरोनामुळे 8  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा पुरुष आणि एका महिलेलेसह   पुणे ग्रामीण मधील दौंड येथील ८९ वर्षीय जेष्ठ महिला रुग्णाचा समावेश आहे. 

पुणे महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. दिवसभरात पुणे महापलिका व अन्य रुग्णालयांमध्ये 1200 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 108  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.

यामध्ये ससून रुग्णांलयातील 10 , नायडू आणि महापालिका रुग्णालयातील 44  आणि खासगी रुग्णांलयातील 54  रुग्णांचा समावेश आहे. सध्या 170  रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यातील 43  व्हेंटिलेटरवर, तर गंभीर प्रकृती असलेल्या 127  रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.

दिवसभरात कोरोनावर विजय मिळविलेल्या 194 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या मध्ये नायडू आणि महापालिका रुग्णालयातील 121, ससूनमधील 7  आणि खासगी रुग्णालयातील 66  रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

आज, एकूण 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात सहा पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. मृत रुग्णांमध्ये सहा जेष्ठ नागरिक आहेत. तर एकजण 47  वर्ष वयोगटातील आहे. त्याचबरोबर दौंड येथील ८९ वर्षीय जेष्ठ महिला रुग्णाचा  कोरोनामुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.  

त्याचबरोबर मृत रुग्णांमध्ये एकजण 57  वर्षीय पुरुष पुणे महापालिकेचा कर्मचारी आहे. आतापर्यंत पुणे महापालिका हद्दीत कोरोनामुळे एकूण ३०८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.