Pune : इयत्ता पहिलीतील आर्यनने लिंगाणा किल्ला केला सर

एमपीसी न्यूज -‘लिंगाणा’ किल्ला हे नाव जरी ऐकले तरी बऱ्याच जणांना धडकी भरते. समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंच, एक हजार फुटापर्यंत फक्त दोरीच्या सहाय्याने जावे लागते. आत्तापर्यंत बऱ्याच वयोगटातील लहान, थोर व्यक्तींनी लिंगाणा यशस्वीपणे सर केला आहे. परंतु प्रथमच इयत्ता पहिलीमध्ये शिकणा-या न-र्हे येथील आर्यन विठ्ठल बेनकर याने लिंगाणा सर केला. आर्यन हा धायरी गावचे विद्यमान उपसरपंच विनायक सीताराम बेनकर यांचा पुतण्या आहे.

या मोहिमेबाबत माहिती देताना अनिल वाघ म्हणाले की, शुक्रवारी दि. 8 फेब्रुवारीला रात्री 2 वाजता मोहरी गावी पोहचलो. जेवण उरकून लिंगाना किल्ल्याच्या दिशेने निघालो. अंधार खूप असल्याने आणि वाट चुकल्यामुळे संपूर्ण रात्र रायलिंग पठारावर काढावी लागली. सकाळी लवकर उठून बोराटाची नाळ उतरून पायथ्याला पोहचलो.

  • शनिवारी सकाळी 10 वाजता तयारीनिशी गड चढण्यास सुरुवात केली. आर्यनचा हा पहिलाच ट्रेक. या अगोदर त्याने छोटे-छोटे डोंगर सर केले आहेत. पहिल्याच ट्रेकमध्ये त्याने लिंगाणा सर केला. इतर गिर्यारोहकांना कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. लिंगाणा माथ्यावर पोहचायला. ही मोहीम सह्याद्री रेंजर्सने आयोजित केली होती. या मोहिमेमध्ये 13 जणांचा सहभाग होता. संदीप अजबे (सिंघम), सूरज परब, कृष्णा, अनिल वाघ यांनी आर्यनला लिंगाणा माथ्यावर अवघ्या 45 मिनिटांत पोहचविण्याची महत्वाची कामगिरी बजावली.

लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते.

  • बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा आणि रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद आणि धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.