Pune : अकाउंट बाद होईल म्हणत 2 लाखांना घातला गंडा

एमपीसी न्यूज : सायबर चोरट्यांचा नवीन फंडा समोर (Pune) आला असून, एका ज्येष्ठ नागरिकाला पावणे दोन लाखाला गंडा घातला आहे. या ज्येष्ठाला युनो अकाउंट ब्लॉक होईल अशी बतावणी करून त्यांना एक लिंक पाठवत पॅनकार्ड अपडेट करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून ऑनलाईनरित्या पैसे ट्रान्सफर केले आहेत.

या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात 64 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईलधारक व बँक खाते धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wanwadi : भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

हा प्रकार नोव्हेंबरमध्ये घडला आहे. तक्रारदार हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचे युनो अकाऊंट आहे. दरम्यान त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोनकरून तुमचे अकाऊंट ब्लॉक होईल. तुम्ही तात्काळ (Pune) पॅनकार्ड लिंकवर जाऊन अपडेट करा, असे सांगितले.

त्यांना एक लिंक पाठ‌वली. तक्रारदारांनी लिंक ओपन करून त्यात माहिती भरली असता सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून 1  लाख 73 हजार रुपये ट्रान्सफरकरून फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.