Pune : विभागात कोरोना बाधित 2 हजार 574 रुग्ण – डॉ.दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज  : पुणे विभागातील 673  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 574 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 1  हजार 764  आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 137  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 287  बाधित रुग्ण असून 608  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 124  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यात 92  बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 145  बाधित रुग्ण असून 9  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 35  बाधित रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 15 बाधित रुग्ण असून 1  रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण 26 हजार 326  नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 25  हजार 4  चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1  हजार 322  नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 22  हजार106  नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 2  हजार 574  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94  हजार 830  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3  कोटी 12  लाख 96  हजार 465  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी एका व्यक्तीला अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.