Pune : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून रोख 20 लाख रुपये जप्त

एमपीसी न्यूज- निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिरस्थावर पथकाने आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास पुण्यातील मुकुंदनगर परिसरातून 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत असताना ही रक्कम सापडली.

स्थिरस्थावर पथकाचे कर्मचारी मुकुंदनगर येथील रांका हॉस्पिटलजवळ नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी करत होते. यावेळी पहाटेच्या सुमारास एक चारचाकी गाडी आली.या गाडीच्या तपासणीदरम्यान डिक्कीत रोख 20 लाख रुपये आढळले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नेमलेल्या पथकाकडून मद्य, पैसे, साहित्य वाटपाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे. अशाप्रकारे निवडणुका लागल्यापासून रोकड पकडण्यात आल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना आहे. अधिक तपास सुरू आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.