Pune: शहरात 201 नवे रुग्ण, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1551, कोरोनामुक्तांची संख्या 1751 तर 194 जण मृत

Pune: 201 new patients in the city, 1551 active corona patients, 1751 corona free and 194 dead

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज कोरोनाचे 210 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 496 झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात 400 कोरोनारुग्णांची भर प़़डली आहे. दिवसभरात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात एका 20 वर्षीय तरुणीसह पाच महिलांचा समावेश आहे. आज 53 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या 1,751 झाली आहे. 

कालपासून दिवसाला साधारण 200 रुग्ण नव्याने समोर येत असल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 1,551 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 141 गंभीर रुग्ण आहेत, तर 45 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

ससून हॉस्पिटलमध्ये कसबा पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 70 वार्षीय महिलेचा, धनकवडीतील 72 वार्षीय पुरुषाचा, हडपसर मधील 20 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्तही निमोनिया आणि इतर आजार होते, अशी माहिती सुसून रुग्णालयाच्या प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

साईनगरमधील 68 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवजीनगर रेल्वे स्टेशन भागातील 75 वर्षीय महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 84 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 70 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 60 वर्षीय महिलेचा इनलॅक्स अँड बुदराणी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे जिल्हयात 4 हजार 1 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 हजार 960  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या  1 हजार 842 आहे. कोरोनाबाधित एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.