Pune : 205 नवे कोरोनाबाधित रुग्ण; सात मृत्यू , 92 जणांना डिस्चार्ज

0

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी दिवसभरात कोरोनाबाधित नव्या रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढेच राहिली. आज 205  नवे रुग्ण दाखल झाले असून कोरोनाबाधित सात जणांचा मृत्यू झाला. 92  रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली.

सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 42  असून क्रिटिकल रुग्णांची संख्या 170 आहे.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4,603 आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1,892, एकूण मृत्यू 248  झाले आहेत. आजपर्यंत  2,463 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1,723 संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे शहरातील ससून रुग्णालयात आज शनिवारी 8  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आहे.

ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण आजही कायम राहिले. आज मृत्यू झालेल्या चार रुग्णामध्ये दोन महिला दोन पुरुष रुग्णांचा समावेश होता.

यामध्ये येरवडा येथील 65  वर्षीय आणि हडपसर येथील 67 वर्षीय महिलेचा समावेश होता. तसेच शुक्रवार पेठ आणि गंज पेठेतील अनुक्रमे 52  आणि  51  वर्षीय पुरुषाचा समावेश होता. या रुग्णांना कोरोनासह अन्य गंभीर आजार होते.

दरम्यान, आज एकूण 210  संशयित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासणी पाठविण्यात आले. त्यापैकी अवघे 8  रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आज कमालीची घट झाली, ही ससून रुग्णालयासाठी समाधानाची बाब आहे.

या रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 131  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

सध्या ससूनमध्ये प्रकृती गंभीर असलेल्या 9  रुग्णांवर व्हेंटिलेटरवर, तर 23  रुग्णांवर व्हेंटिलेटरशिवाय उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 132 रुग्णांचा कोरोनामुळे या रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like