Pune : कोरोनामुक्त झालेल्या 205 जणांना आज डिस्चार्ज; 10 रुग्णांचा मृत्यू

205 people released from corona discharged today; Death of 10 patients

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे गुरुवारी आणखी 10 जणांचा मृत्यू झाला. तर 205 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 318 नवीन रुग्ण आढळले.

पुणे शहरात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 5 हजार 851 आहेत. यातील बरे झालेले रुग्ण 3 हजार 264 आहेत. तर, सद्यस्थितीत 2 हजार 294 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत 293 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. सध्या गंभीर अवस्थेत 150 रुग्ण असून, 49 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आज 1 हजार 315 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या.

ससून रुग्णालयात हडपसरमधील 70 वर्षीय व येरवड्यातील 35 वर्षीय पुरुषाचा, कोंढव्यातील 68 वर्षीय, नाना पेठेतील 75 वर्षीय व पर्वतीमधील 50 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह असे आजार होते.

तर, गोखलेनगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा वायसीयम हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 59 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, बोपोडीतील 45 वर्षीय महिलेचा डी. एच. हॉस्पिटल औंधमध्ये, पर्वतीमधील 61 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, येरवड्यातील 74 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा आताच 5 हजार 851 झाला आहे. महापालिका प्रधासनातर्फे मे अखेरीस 5 हजार रुग्ण होणार असलयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हे रुग्ण आता 6 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या रोगामुळे आतापर्यंत 293 जणांचा मृत्यू झाला आहे.

सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. त्यामुळे पुण्यात आणखी लॉकडाऊन वाढणार असल्याचे समजते. दरम्यान, आज कोरोनाचे तब्बल 318 नवीन रुग्ण आढळले.

ससून रुग्णालयात कोरोनामुळे आणखी 5 जणांचा मृत्यू

ससून रुग्णालयात गुरुवारी कोरोनामुळे आणखी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 164 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 151 जण दगावले आहेत. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह असे आजार होते, अशी माहिती ससून रुग्णालयातर्फे देण्यात आली.

पुणे जिल्ह्यात 3 हजार 661 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 879 झाली असली तरी 3 हजार 661 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. जिल्ह्यात अॅक्टीव्‍ह रुग्ण संख्या 2 हजार 912 असून पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर, 180 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. आज पुणे जिल्ह्यात 275 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. पुणे जिह्यात 306 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने भीती निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तर, दुसरीकडे 3 हजार 661 जण कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, ही समाधानकारक बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.