Pune : पुणे विभागात मार्केटमध्ये 21 हजार 552 क्विंटल अन्नधान्यांची आवक -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – पुणे विभागात शुक्रवारी (दि. 3) रोजी मार्केटमध्ये एकूण 21 हजार 552 क्विंटल अन्नधान्याची आवक झाली आहे. तसेच 95 लाख 17 हजार लीटर दुधाचे संकलन झाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात मार्केटमध्ये 6 हजार 854 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. 9 हजार 544 क्विंटल फळांची आवक झाली, तर 78 हजार 931 क्विंटल कांदा, बटाटयाची आवक झाली आहे. तसेच 95 लाख 17 हजार लीटर दुधाचे संकलन झाले आहे. 23 लाख 93 हजार लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरूपात वितरण करण्यात आले आहे.

तर उर्वरित दूधाची सुटटया स्वरूपात विक्री करण्यात आली आहे. तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबंधीत जिल्हयातील अधिका-यांशी संपर्क साधता येईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागातील अधिकारी –
# पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड (020-26061013), अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे (020-26123743)
# सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहल किसवे (02162-234840)
# सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे (0233-2600512)
# कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके (0231-265579)
# सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील (0217-2731003)

आडते व कामगारांना जिल्हाधिका-यांनी दिलेल्या ओळखपत्रांनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रवेश द्यावा

कृषि उत्पन्न बाजार समित्या निर्विघ्नपणे सुरू राहण्यासाठी पोलीस विभागाकडून डिजिटल पासेस मिळेपर्यंत जिल्हाधिकारी, पुणे यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आडते व कामगार यांना दिलेल्या ओळखपत्रांनुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये प्रवेश देण्यात यावा व कृषी उत्पन्न बाजार समितीस योग्य तो पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पोलीस विभागाला केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.