Pune : धरण क्षेत्रात 21 टीएमसी पाणीसाठा; पुणेकरांना जाणवणार नाही टंचाई

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यंदा 8 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत 13 टीएमसी इतका पाणीसाठा होता. यंदा 21 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुणेकरांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही. असे असले तरी जलसंपदा विभाग वारंवार पुणे महापालिकेला जपून पाणी वापरण्याचा सल्ला देत असतो.

यापूर्वी पाणी कट केल्याचाही प्रकार घडला होता. जलशुद्धीकरण केंद्रांची देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेतर्फे शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे 2 ते 3 दिवस पाणी येत नाही.

शहरातील पेठांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. तर, गोखले नगर, डेक्कन जिमखाना, आपटे रोड पाण्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे लोहगाव परिसरात 8 – 8 दिवस पाणी येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.