Pune: PMPML च्या 2100 रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला नाही एप्रिलचा पगार

Pune: 2100 daily wages employees of PMPML did not get April salary

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) रोजंदारीवरील 2100 कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार मिळालेला नाही. पीएमपी व्यवस्थापनाने कामागार आयुक्तांकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. मात्र, वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

PMPML च्या व्यवस्थापनाकडून लॉकडाऊनच्या काळात या २१०० कामगारांना (चालक, वाहक आणि अन्य बदली कामगार) काम न दिल्याने या कर्मचाऱ्यांना वेतनही दिलेले नाही. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील वाहतूक सेवा बंद ठेवावी लागली. त्याचा आर्थिक फटका PMPML ला बसला तसाच रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बसला.

रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात आले. मात्र, एप्रिल महिन्याचे देण्यात आले नाही. याबाबत मार्गदर्शन करावे असा प्रस्ताव कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

PMPML पुढे आर्थिक आव्हाने मोठी आहेत. ही स्थिती सावरण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2100 कामगारांच्या वेतनाचे भवितव्य काय, याकडे कामगारांचे लक्ष राहील.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.