Pune : कोरोनाचे 212 नवे रुग्ण; 255 रुग्णांना डिस्चार्ज, 8 जणांचा मृत्यू  

212 new patients with corona; Discharge of 255 patients, death of 8 persons

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 255 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. दिवसभरात 212 नव्याने रुग्णांची वाढ झाली. विशेष म्हणजे आज बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

शहरात सध्या 280 क्रिटिकल रुग्ण असून, 55 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 4 हजार 496 आहे. आतापर्यंत या रोगामुळे 518 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 7 हजार 672 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे 12 हजार 686 रुग्ण झाले आहेत. आज, सोमवारी कोरोनाच्या तब्बल 3 हजार 227 टेस्ट करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

विश्रांतवाडीतील 44 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, दत्तवाडीतील 30 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 59 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 77 वर्षीय पुरुषाचा ऐआयसीटीएस हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 55 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 84 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 61 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, वाकडेवाडीतील 69 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता साडे बारा हजारांच्या पुढे गेली आहे. तर, 500 पेक्षा जास्त नागरिकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.