Pune – खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील 23 हजार लंपास

एमपीसी न्यूज – खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील 23 हजार लंपास झाल्याची घटना काल रविवारी(दि.23) रात्री सव्वाआठच्या दरम्यान एम.जी.रोड कॅम्प येथील रतन आर्ट कलर्स दुकानासमोर घडली.

याप्रकरणी राणी गजभीये (वय 27, रा. गायत्रीनग, नागपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राणी गजभीये या  एम.जी.रोड कॅम्प येथील रतन आर्ट कलर्स दुकानासमोर खरेदी करत असताना त्यांच्या जवळ असलेल्या मिनी पर्समधील 23 हजारांची रोकड आणि काही कागदपत्र अज्ञान चोरट्याने त्यांच्या नकळतपणे चोरून नेले.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.