Pune District Crime News : पुणे – सोलापूर महामार्गावर 24 लाखाचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.  

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करत तब्बल 24 लाखाचा गांजा जप्त केला. गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. सचिन कुमार मिरगणे (वय 32 वर्षे रा सुभाष नगर चौदा नं शाळे पाठीमागे बार्शी, जि सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पुणे ग्रामीण पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उरळीकांचन परिसरातून 28 किलो वजनाचा 8 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी या परिसरात गाण्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी मोहीम राबवली. दरम्यान अशाच प्रकारे पुन्हा एकदा पुणे-सोलापुर महामार्गावरून एका चार चाकी गाडीतून राज्याचे वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. 

 

त्यानुसार पोलिसांनी भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकोले गावाजवळ सापळा रचून एक ज्येष्ठ गाडी ताब्यात घेतली. या गाडीची तपासणी केली असता पाच पोत्यात भरलेला तब्बल 150 किलो गांजा आढळला. त्यानंतर पोलिसांनी गाडीसह चालकाला ताब्यात घेत 28 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

आरोपी सचिन मिरगणे याच्यावर गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९५८चे कलम ८(क),२०(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील तपासासाठी त्याला भिगवण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.