Pune: भारतीय मजदूर संघ कार्यालयात 24 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा व मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या वीज उद्योगातील महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ व महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांच्या संयुक्त उपक्रमातून पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक या संस्थेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात  शुक्रवारी (दि.27) पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.  

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या एकूण 24 कामगारांनी सामाजिक भान जपत रक्तदान केले. याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, कामगार महासंघाचे उपमहामंत्री विजय हिंगमीरे, तुकाराम डिंबळे, कंत्राटी कामगार संघाचे निलेश खरात, सचिन मेंगाळे, सागर पवार, राहुल बोडके, सुमित कांबळे प्रवीण पवार, पूना सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकेचे चंद्रशेखर माने व अन्य सहकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1