Pune : जादा परतावा मिळेल सांगून 24 जणांची फसवणूक

एमपीसी न्यूज- व्हर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञानाच्या ( Pune ) माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या हळद उत्पादन प्रकल्पात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून 24 जणांची सुमारे 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

या प्रकरणी अकोला येथील एका 63 वर्षीय शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

Today’s Horoscope 29 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या संदर्भात प्रशांत झाडे (रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रोहन मताले, संदेश गणपत खामकर (रा. ठाणे), जयंत रामचंद्र बांदेकर (रा. बोरिवली पश्चिम, मुंबई), कमलेश महादेवराव ओझे (रा. कळवा, जि. ठाणे) आणि बाणेर येथील ए. एस. ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून व्हर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या हळद उत्पादन प्रकल्पात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले.

कृषी उत्पादनात ही कंपनी अव्वल असल्याची बतावणी करून त्यांनी गुंतवणूकदारांकडून 13  कोटी 82 लाख87 हजार रुपये घेतले. परंतु त्यांना परतावा आणि मुद्दलही परत केले नाही. सन 2019 पासून हा प्रकार सुरू होता.

फिर्यादीने आरोपींकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम दिली. परंतु प्रकल्पाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासादरम्यान आरोपींनी अशा प्रकारे इतर 23 व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कदम करीत ( Pune ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.