Pune – आगीत इलेक्ट्रिक दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज – पिरंगुट चौकातील एका इलेक्ट्रिक च्या दुकांनाला आग लागून पूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना (दि.12) ला रात्री 12 च्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

प्राथमिक माहितीनुसार,रात्री 12 च्या सुमारास दुकानास आग लागली. या आगीत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच एरंडवणा येथील एक, कोथरुड येथील एक अशा अग्निशमन विभागातील 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.एका तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशामक दलाच्या जवानांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.