Pune : दुर्गभ्रमंती…हरिहरगड उर्फ हर्षगड !!!

(दीपक झोरे)
एमपीसी न्यूज – नाशिक जिल्ह्यातीळ प्रसिद्द गड . देखणा असलेला हा किल्ला त्यावर असलेल्या कोरीव पायऱ्यामुळे सर्वांचा आवडता. निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन गावातून पायवाटा आहेत. कोटमवाडीतुन न चूकता जाता येते.वाट थकवणारी आहे.उभी चढणं असल्याने थोडी अवघड ही चढण न थांबता गेल्यास एक तासात वरील पठारावर घेऊन जाते. साधारण दहा मिनिटे सरळ गेल्यावर एक छोटा रॉकपॅच चढावा लागतो. 
 
परत थोडे सरळ चालून आपण कोरीव पायऱ्यापाशी पोहोचतो. प्रत्येक पायरीवर खाचा केलेल्या आहेत त्यामुळे वर चढणे सोपे जाते. खरतर नजरा इतका सुंदर आहे त्या जागेवरून पाय हलत नाही. दरवाजा बघितल्यावर पायऱ्या संपल्या असा गोड गैरसमज आपण करून घेतो पण खरा थरार पुढेच आहे. डोंगर पोखरून केलेली वाट काळजाचा ठोका चुकवते. पुढे जाताना सरळ दोन हजार फूट खोल दरी दिसते. पुढच्या पायऱ्या देखील कड्याच्या बाजूने वर जातात. जरा जपूनच चढावे लागते. दुसऱ्या दरवाज्या नंतर मात्र हुश्श करतच आपण गडावर पोहोचतो. 
इतकं सगळ केल्यावर झालेल्या त्रासापेक्षा आनंदच जास्त होतो. वर उघड्यावर देवाच्या मूर्ती आहेत आणि शेजारीच दोन पाण्याची टाकी आहेत- छोट्या टाक्यातील पाणी स्वछ आणि थंडगार आहे. हा पाणीसाठा वर्षभर असतो. गडावरील उंच ठिकाणी रॉकपॅच चढून जावे लागते. मात्र तेथून दिसणारा नजारा काही औरच. या  गडाचा वापर टेहळणी करण्यासाठीच होत होता. कोणत्याही सीझन मध्ये या गडावर येत येते. त्र्यंबकेश्वर च्या तीन। की.मी अलीकडे डाव्या फाट्याने गडाकडे साधारण वीस की।मी अंतर पुढे यावे लागते. अश्या या गडावर एकदा तरी यायलाच पाहिजे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.