Pune : शहरात नवे 246 कोरोनाबाधित रुग्ण,140 जणांना डिस्चार्ज ; नऊ रुग्णांचा मृत्यू

246 new coronary artery patients in the city, 140 discharged; Nine patients died

एमपीसीन्यूज – शहरात दिवसभरात कोरोनाबाधित नव्या रुग्णांची संख्या 246  झाली आहे. तर  कोरोनाबाधित नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. 140  रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली. सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 44  असून क्रिटिकल रुग्णांची संख्या 176  आहे.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 5,427 आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2,279 इतकी आहे.

शहरात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 273  मृत्यू झाले आहेत. तर कोरोना आजरातून बरे झालेल्या एकूण 2, 875 रुग्णांना डिस्चार्ज डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात 2,044 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने कळविले आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयात आज, मंगळवारी  आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनामुळे ससून रुग्णालयात आतापर्यंत 143 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.  आज येरवड्यातील 30 वर्षीय महिला, नाना पेठेतील 76 वर्षीय पुरुष, पुणे कॅम्पमधील 48 वर्षीय आणि हडपसरमधील 67 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.