Pune : मान्सून पुर्व पावसामुळे पुणे शहर परिसरात काल 25 झाडपडीच्या घटना

एमपीसी न्यूज – मान्सून पुर्व पावसाने (Pune) मागील तीन दिवसांपासून पुणे शहरात मुक्काम ठोकला असून गारा वादळी वारे अन पाऊस यांचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. याचाच फटका म्हणून पुणे शहर परिसरात काल (गुरुवारी) एकूण 25 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

खडकी, औंध, येरवडा, बोपोडी या भागात काल सायंकाळी अवघ्या दोन तासात 25 झाडे किंवा त्यांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गाड्यांचे नुकसान तसेच नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. अग्निशमन दलाच्या एकूण आठ वाहानांनी घटनास्थळी जात ही झाडे हटवली आहेत.


खडकी-औंध रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील पिंपळाचे मोठे झाड कोसळले. त्यामुळे ब्रेमन चौकाकडून खडकी स्टेशनकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना या (Pune) वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागला. तर पाषाण-सूस रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागली.

Chakan : चाकणच्या विकासाकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची गरज – राजेश अग्रवाल

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी अकरापासून दुपारी दोनपर्यंत तापमानात वाढ होऊन दुपारनंतर काही ठिकाणी विजांसह पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्थानिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. उष्णतेत वाढ झाल्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी वादळासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे नागरिकांनो घराबाहेर पडताना व गाडी पार्क करताना योग्य ती काळजी घ्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.