Pune: पुणे विभागात कोरोना बाधित 25127 रुग्ण; 15095 रुग्णांना डिस्चार्ज

Pune: 25127 patients infected with corona in Pune division; Discharge to 15095 patients आजपर्यत विभागामध्ये एकूण 1 लाख 67 हजार 400 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 64 हजार 561 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

एमपीसी न्यूज- पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 25 हजार 127 झाली आहे. त्यातील 15 हजार 95 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात 9 हजार 19 ॲक्टीव रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 1 हजार 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 487 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

रविवारी (दि. 28) दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकूण 1 लाख 67 हजार 400 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 64 हजार 561 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

तर 2 हजार 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 39 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 25 हजार 127 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

शनिवारच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 157 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 990, सातारा जिल्ह्यात 57, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 09 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा- पुणे जिल्हयातील 20 हजार 577 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 11 हजार 942 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 937 आहे.

कोरोनाबाधित एकूण 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 356 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.04 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा- सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 974 रुग्ण असून 711 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 221 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा- सोलापूर जिल्हयातील 2 हजार 434 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 515 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 666 आहे. कोरोना बाधित एकूण 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा- सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 328 रुग्ण असून 214 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 104 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा- कोल्हापूर जिल्हयातील 814 कोरोना बाधीत रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 91 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.