Pune : ‘अमृत योग साधने’तर्फे पर्सिस्टंट कंपनीत योग दिवस ‘ साजरा

एमपीसी न्यूज- वेळेशी ,ताणतणावाशी स्पर्धा करीत काम करणाऱ्या पुण्यातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी ‘योग साधनेची दीक्षा घेतली. ‘अमृत योग साधना ‘ समूहातर्फे तर्फे ‘पर्सिस्टंट कंपनीत योग दिवस ‘ साजरा करण्यात आला.

मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके करण्यात आली. ‘पर्सिस्टंट ‘ समूहाचे अध्यक्ष आनंद देशपांडे, वृंदा पारसनीस, सिद्धार्थ पेंडसे हे सहभागी झाले. अमृत योग् साधनेचे साधक सचिन सुभेदार, पल्लवी पाटील, अपूर्वा देशपांडे, गिरीजा, सोनम, रुपाली यांनी प्रात्यक्षिके सादर केली. एक ते १०८ सूर्यनमस्कार यावेळी मंत्र पठणासह सादर करण्यात आले .

स्पर्धेच्या युगात कामाचे ताण ,व्याधी ,मानसिक असंतुलन यांचा सामना करण्यासाठी भारतीय योग साधना उपयुक्त आहे ‘ असे प्रतिपादन यावेळी मिलिंद देशपांडे यांनी केले. हा उपक्रम पर्सिस्टंट च्या सर्व कार्यलयांमध्ये सकाळी साडेसात वाजता साजरा झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.