Pune : ‘सेव्ह वेटलँड हतनूर’ वर अनिल महाजन यांचे बुधवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज- भुसावळ जवळील हतनूरच्या पाणथळ जमिनीला वाचविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘जीविधा’, ‘देवराई फाऊंडेशन‘, ‘निसर्गसेवक’ या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे व्याख्यान बुधवारी (दि. ११ ) सायंकाळी साडेसहा वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र (राजेंद्रनगर) येथे होणार आहे, अशी माहिती ‘जीविधा’ संस्थेचे संचालक राजीव पंडीत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.