Pune : दारुपीडित महिलांच्या करुण कहाण्यांना फुटणार वाचा

स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन व साद माणुसकीची संस्थेतर्फे गुरुवारी मुलाखत-नाट्य कार्यक्रम

एमपीसी न्यूज – "रोजची मारहाण, आरडाओरडा… घरात होणारी भांडणं… बायका-पोरांवर ढोरांसारखा अत्याचार… त्यातून होणाऱ्या आत्महत्या अन मृत्यू… तारुण्यातच कपाळाचं कुंकू पुसणं… चिमुकल्यांच्या डोक्यावरचं बापाचं अगर आईचं छत्र जाणं… अख्खा संसार आणि कुटुंब उद्ध्वस्त होणं… हे सगळं होत असताना निमूटपणे सहन करणं हेच स्त्रीच्या नशिबी…" पण आता नाही. त्याही जाग्या झाल्यात, उभारताहेत या दारुरूपी राक्षसाचा सामना करण्यासाठी. या लढ्यातल्या आणि दारूच्या पीडिता ठरलेल्या महिलांच्या कहाण्यांना वाचा फुटणार आहे.

स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन आणि साद माणुसकीची या सामाजिक चळवळींच्या पुढाकारातून या दारूपिडीत महिलांच्या मुलाखतीचा व सत्य घटनांवर आधारित नाटिकांचा कार्यक्रम आयोजिला आहे. येत्या गुरुवारी (दि. १२ ) सायंकाळी सहा वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीतील दारूपिडीत कुटुंबातीलच महेश पवार या युवकाने उभारलेल्या या चळवळीबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी साद माणुसकीचे हरीश बुटले, संदीप बर्वे, ज्ञानेश्वर जाधवर, सचिन अशा सुभाष, अभिजित मंगल, गणेश सातव यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.