Pune : ‘जीविधा’ संस्थेचा ‘पृथ्वी विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम’

एमपीसी न्यूज- ‘जीविधा ‘या संस्थेने ‘पृथ्वी विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ आयोजित केला आहे. या अभ्यासक्रमात विश्वाची आणि पृथ्वीची निर्मिती,पृथ्वीवरील वातावरण, समुद्र यांच्या निर्मिती बरोबरच इतर प्राणिमात्रांची व मनुष्याची सुरुवात, पृथ्वीच्या गती, दिवस-रात्र, ऋतू यांची निर्मिती, कालगणना, भरती -ओहोटी, नद्या, हिमनद्या, समुद्र, वारे यांचे कार्य आणि त्यातून निर्माण होणारी विविध भूरूपे ,या विषयांचा समावेश असेल. हवामान बदल, भूकंप, ज्वालामुखी ,समुद्र पातळीतील बदल अशा संकल्पनांचाही त्यात समावेश आहे.

ज्या निसर्गनिर्मित आणि मनुष्यनिर्मित संकटांचा व आपत्तींचा सामना करीत आहोत त्यांचे भूशास्त्रीय विवेचन व आपत्ती निवारणाचे उपाय अशा आवश्यक गोष्टींबाबतही या प्रमाणपत्र अभ्यासक्रमादरम्यान मार्गदर्शन केले जाणार आहे.

डॉ. श्रीकांत कार्लेकर, प्रा. संजीव नलावडे, प्रा. इरावती नलावडे, डॉ. अजित वर्तक यासारखे भूशास्त्र विषयातील अनेक तज्ज्ञ या अभ्यासवर्गाला मार्गदर्शन करणार आहेत.

अभ्यासक्रमाच्या माहिती व नावनोंदणीसाठी जीविधाचे संचालक वृंदा पंडित यांच्याशी 9421832912 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी – दिनांक १३ जूलै ते १३ आॅक्टोबर २०१८ पर्यंत आहे . दर शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी ६.१५ ते ८. ३० यावेळेत पंडितराव आगाशे हायस्कूल, लाॅ काॅलेज येथे व्याख्याने होणार आहेत. तसेच दर रविवारी अभ्यास सहली, पुण्या बाहेर पूर्ण दिवसाच्या दोन व पुण्यात अर्ध्या दिवसाची दोन अभ्यास सहली होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.