BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम

विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांची माहिती ; सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू, आजही अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात 11, कोल्हापूर 2, पुणे 6, सातारा 7, सोलापूर 1 असे एकूण 27 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे. तसेच आजही साताऱ्यातील दोन कोल्हापूरातील 5 तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पुणे विभागात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये 225, सातारा इथे 180, पुण्यात 168, कोल्हापूरमध्ये 123, सोलापूर 78 टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण, ओढे-नाले, नद्या, तळी आदी तुडुंब भरले आहे. यातच धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर भागात अधिक प्रमाणात महापूर आला आहे. यावेळी एनडीएफचे जवान, खासगी संस्था, कार्यकर्ते, आदी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवत आहेत.

  • सांगलीत 80319 कुटुंब स्थलांतरित, 94 केंद्रात त्याची व्यवस्था करण्यात आली. तर, कोल्हापूरमध्ये 97102 कुटुंबाचे स्थलांतर करून 154 निवारा केंद्रात आणि साताऱ्यात 7085 कुटुंबाचे स्थलांतर करून 17 निवारा केंद्र उभारली आहेत. आतापर्यंत संपूर्ण पुणे विभागात सुमारे 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित केले असून सुमारे 330 निवारा केंद्रात लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू
सांगली जिल्यातील पलूस भागात ग्रामपंचायतची बोट उलटून सुमारे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट खासगी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, यात सुमारे 20 जण वाहून क्षमता होती. मात्र, यात 30 हुन अधिक नागरिक बसल्याने बोट पलटी झाली. यात काहीच मृत्यू झाला असून काहीजण अदयाप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 9 मृतदेह सापडले आहेत.तर, चार ते पाच व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like