Pune : विभागात 2,885 कोरोना बाधित रुग्ण, एकूण 157 मृत्यू; 837रुग्ण झाले बरे

Pune: 2,885 corona-infected patients in the Pune Revenue Division, a total of 157 deaths; 837 patients were cured

एमपीसी न्यूज  : पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 2 हजार 885 बाधित रुग्ण असून 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 2 हजार 537 बाधित रुग्ण असून 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 762 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 1 हजार 634 आहे. तर 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यात 114 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 98 आहे.

सोलापूर जिल्ह्यात 182 बाधित रुग्ण असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 141 आहे.

सांगली जिल्ह्यात 37 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर 26 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 10 आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 15 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 6 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 8 आहे.

आजपर्यंत विभागात एकूण 29 हजार 319 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 हजार 795चा अहवाल प्राप्त झाला आहे. 1 हजार 524 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 24 हजार 930 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 2 हजार 885 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागात 85 लाख 23 हजार 712 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 46 लाख 46 हजार 506 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 74 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.